Sidharth Malhotra आणि अभिनेत्री Kiara Advani फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी ही जोडी 6 फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणारे.
याआधी या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या मात्र आता दोघांनी लगीनगाठ बांधायचं नक्की केलंय. राजस्थानमधील जैसलमेर पॅलेस हॉटलमध्ये त्यांचा विवाह सोहळा संपन्न होणारेय. यावेळी पिलस बंदोबस्त देखील ठेवण्यात येणारेय. 'लस्ट स्टोरीज' या सीरीजच्या व्रॅपअप पार्टीत या दोघांची ओळख झाली. यानंतर या दोघांनी शेरशाहा या चित्रपटात एकत्र काम केलं. त्यानंतर त्याच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर ६ फेब्रुवारीला या दोघांची लगीन गाठ पक्की होणारेय.





















