एक्स्प्लोर
Gangubai Kathiawadi चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, कामाठीपुराचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप
येत्या 25 फेब्रुवारीला चित्रपटगृहात झळकण्यासाठी तयार असलेल्या गंगुबाई काठियावाडी चित्रपटावर आता प्रदर्शनापूर्वीच वादाचे ढग जमू लागले आहेत. या चित्रपटाला कामाठीपुरा भागातील स्थानिक नागरिकांनी आता विरोध करायला सुरुवात केलेय. काल या नागरिकांनी हातात बॅनर घेत चित्रपटाचा निषेध करणारी घोषणाबाजी केलेय. कामाठीपुराचं ज्या पद्धतीनं चित्रण या चित्रपटात केलंय ते चुकीचं असल्याचा दावा या नागरिकांचा आहे. या भागातील 42 गल्ल्यांपैकी फक्त 3 गल्ल्यांमध्येच देहविक्रयाचा व्यवसाय चालतो मात्र चित्रपटातील दृश्यांमुळे कामाठीपुरात राहणाऱ्या नागरिकांची बदनामी होत असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Alia Bhatt ताज्या बातम्या Gangubai Kathiawadi ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Gangubai Kathiawadi Controversy Gangubai Kathiawadi Kamathipura Gangubai Kathiawadi Film Gangubai Kathiawadi Alia Bhattआणखी पाहा






















