Amitabh Bachchan यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त जुहूमध्ये पोस्टर आणि फोटोंचं प्रदर्शन ABP Majha
बिग बी अमिताभ बच्चन हे मंगळवारी वयाची 80 वर्षे पूर्ण करतायत. यानिमित्ताने देशातील 15 शहरात अमिताभच्या चित्रपटांचा महोत्सव सुरु आहेच शिवाय पीव्हीआरच्या वतीने मुंबईतल्या जुहूमधील पीव्हीआरमध्ये पोस्टर आणि फोटोंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. अमिताभ यांचे चाहते एस. एम. ओसुजा यांच्या कलेक्शनमधील पोस्टर्स आणि पेंटिंग्ज आहेत. 70 च्या दशकातील महानायक अशी संकल्पना घेऊन हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. येत्या मंगळवारपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. जया बच्चन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उदघाटन झालं. सुमारे १०० फोटो या प्रदर्शनात ठेवण्यात आलेत. अमिताभ यांच्या चित्रपटांच्या मेकिंगचे क्षणही या प्रदर्शनात खास लक्षणीय ठरलेत.























