एक्स्प्लोर
Kangana Ranaut सुनावणीला गैरहजर राहिल्यास कोर्ट अटक वॉरंट बजावण्याची शक्यता
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतला कोणताही दिलासा देण्यास नकार देत हायकोर्टानं तिची याचिका फेटाळून लावली आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं सुरू केलेली कारवाई ही कायदेशीरदृष्ट्या योग्यच असल्याचा निर्वाळा हायकोर्टानं दिला आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयानं सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची कारवाई अयोग्य आहे त्यामुळे ती रद्द करावी अशी मागणी कंगनानं हायकोर्टात केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी 1 सप्टेंबर रोजी राखून ठेवलेला आपला निकाल गुरूवारी जाहीर केला.
आणखी पाहा























