एक्स्प्लोर
Yavatmal : 15 दिवसाच्या मुलीला साडेतीन लाखात विकण्याचा घाट, सहा जण अटकेत
वणी येथील बेटी फाऊंडेशन संस्थेने 15 दिवसाचे बाळ दत्तक देण्यास उपलब्ध आहे असा संदेश सोशल मिडियावर व्हायरल केला होता सदर संदेश अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांनी वाचल्यावर त्यांनी व्हायरल मेसेजची खात्री करण्यासाठी व्यूहरचना आखली बाल कल्याण समितीने वणी येथील बेटी फाऊंडेशनला संपर्क साधून बाळाच्या विक्री बाबत विस्तृत माहिती संकलित केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत महिला व बालकल्याण आयुक्त यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्टिंग ऑपरेशन करीत त्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















