Panvel Rape Case | पनवेलमधील बलात्काराप्रकरणी गृहमंत्री कधी माफी मागणार? किरीट सोमय्यांचा सवाल
पनवेल महानगरपालिकेने बनवलेल्या कोरोना सेंटरमध्ये महिलेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी भाजपने राज्य सरकारवर टीका केली आहे. रूग्णालय असो किंवा कोरोना सेंटर कुठेच महिला सुरक्षित राहिल्या नाहीत. कोरोना सेंटर वर जर महिलांवर अत्याचार होत असतील तर कोरोना झालेल्या महिलेने घरातच मरायचे का असा संतप्त सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. पनवेल मधील कोरोना सेंटरची पाहणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर गेले होते. महिलांचा विनयभंग होणे, रूग्णालयातून रूग्ण पळून जाणे, मृत्यदेहाची अदलाबदल होणे हे आता नित्याचेच झाले असून ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.























