Sana Khan Case Update : सना खान तपासात सापडलेलं रक्त सना खानचेच, DNA त उघड
नागपुरातील भाजप पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणी तपासात मोठी माहिती समोर येतेय...पोलिसांना आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग हे सना खानचेच असल्याचं तपासात उघड झालंय.. रक्तातील डीएनए आणि सना खान यांच्या आईच्या रक्ताचे डीएनए पूर्णपणे मॅच झालेत... नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबमधील तज्ञांनी त्या संदर्भातील गोपनीय अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सोपवल्याची एबीपी माझाची खात्रीलायक सूत्रांनी दिलीए.. जबलपूरमधील ज्या घरी सना खानची हत्या झाली, तिथल्या सोफ्याच्या फोम मध्ये सुकलेल्या अवस्थेत रक्ताचे डाग आढळले होते... ज्या लाकडी दांडुक्याने अमित साहूने सना खानची हत्या केली... त्यालाही रक्ताचे डाग लागले होते... अमित साहूच्या कारमध्येही मध्ये आढळलेल्या रक्ताचे डीएनएही सना खान यांच्या कुटुंबीयांच्या डीएनए सोबत मॅच झाले आहे...























