एक्स्प्लोर
Pune Police : गाडी काढण्यावरुन वाद, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल
पुण्यात किरकोळ वादातून पोलीस कर्मचारी मोटे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना लोहभाग येथे घडलीये. मोटे यांनी धानोरी जकात नाका परिसरात दुचाकी लावली होती. दरम्यान त्यांच्याच मोटारीजवळ त्याच परिसरातील खांदवे यांनी दुचाकी लावली. दरम्यान मोटे यांनी खांदवे याला दुचाकी काढण्यास सांगितलं. त्यानंतर खांदवे याने साथीदारांना बोलावून घेतलं आणि पोलीस कर्मचारी मोटे यांना माराहण केली. पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















