एक्स्प्लोर
कोथरूडमध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता 11 वर्षीय मुलाची हत्या, हत्येमागचं कारण अस्पष्ट
पुण्यातील कोथरूड भागातील केळेवाडी मधून मागील तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या विश्वजीत वंजारी या अकरा वर्षाच्या मुलाचा हत्या झाल्याचं उघड झालय. छिन्न- विच्छिन्न अवस्थेतील विश्वजितचा मृतदेह त्याच्या घरापासून काही अंतरावरतीच दगडाखाली आढळून आलाय. लहान मुलांच्या खेळण्यातील वादातून ही हत्या झालेली असावी का याचा पोलीस तपास करतायत. विश्वजीत हा खेळायला जातो म्हणून तीन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडला होता. मात्र संध्याकाळ झाल्यावरही तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तो गायब झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर पोलिसांनी विश्वजीतचा शोध सुरू केला होता. त्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना विश्वजीतची माहिती देण्यास आवाहन करण्यात आलं होतं. परंतु तीन दिवसांनंतर त्याचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या राडारोड्याखाली आढळून आलाय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















