Mahabaleshwar : लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती, प्रकरण लपवण्यासाठी पीडितेची घरीच प्रसुती, 13 आरोपी
महाबळेश्वरात खळबळजनक घटना घडली असून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर गरोदर राहिलेल्या मुलीची घरात प्रसुती करुन प्रकरण दडपण्यासाठी झालेले बाळ हे मुंबईमध्ये एकाला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महाबळेश्वर पोलिसांनी अत्याचार करणा-या दोन युवकांना अटक केलीच शिवाय हे प्रकरण मिटवण्यासाठी ज्यांनी मदत केली अशा सर्व 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात शिवसेना नेते डी एम बावळेकर यांच्या दोन मुलांचाही यात समावेश आहे. महाबळेश्वरातील एका 15 वर्षाच्या मुलीवर महाबळेश्वरातीलच आबा उर्फ सागर गायकवाड, अशितोष बिरामणे या दोन युवकांनी अत्याचार केला होता. त्यानंतर ही मुलगी गरोदर राहिली.
हे प्रकरण दडपण्यासाठी तिची प्रसुती घरातच करण्यात आली होती. जन्माला आलेले बाळ कांदिवली मुंबई येथील सुनिल चौरासीया यांना दिले होते. हा सर्व प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत सागर गायगवाड आणि आशितोष बिरामणे या दोघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या दोघांनी दिलेल्या माहिती नुसार शिवसेनेचे नेते डी एम बावळेकर यांचा मुलगा योगेश बावळेकर आणि सात्विक बावळेकर यांच्या मदतीने हे बाळ कांदिवली येथील चौरासिया या कुटुंबाला हे बाळ दिले होते. याबाबात पोलिसांनी या सर्व प्रकरणात 13 जणांवर गुन्हे दाखल केल्यानंतर यात चौघांना अटक झाली असून शिवेसेना नेते डी एम बावळेकर यांची दोन्ही मुलांसह 9 नऊ जण फरार झाले असून सर्वांचा पोलीस शोध घेत आहेत.