Lata Hagwane : लता हगवणेंचा कारनामा उघड, आर्थिक फसवणूक केल्याचा प्रशांत येळवंडेचा आरोप
Lata Hagwane : लता हगवणेंचा कारनामा उघड, आर्थिक फसवणूक केल्याचा प्रशांत येळवंडेचा आरोप
शांक आणि लता हगवणेला उद्या म्हाळुंगे पोलीस अटक कारणार आहेत...न्यायालयाने आज तशी परवानगी दिल्यानं उद्या येरवडा तुरुंगातून पोलीस आई-लेकाचा ताबा घेणार आहेत...हगवणे आई-लेकाने जेसीबी विक्री करताना फसवणूक केल्याचा आरोप निगोजे गावचे प्रशांत येळवंडेंनी केलाय...२०२२ पासून ऍडव्हान्स आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी प्रशांत यांनी ११ लाख ७० हजार रुपये लता हगवणेंच्या खात्यावर टाकलेत...मात्र काही महिन्यांतच बँकेने प्रशांत यांच्याकडून जेसीबी ताब्यात घेतला...प्रकरण म्हाळुंगे पोलिसात गेलं पण तिथंही पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे...मात्र आता वैष्णवीच्या प्रकरणानंतर मात्र जागे झालेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला...
नेमकं प्रकरण काय यासंदर्भात प्रशांत येळवंडेंशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी नाजीम मुल्ला यांनी...























