एक्स्प्लोर
Jalna : अवैध वाळू वाहतुकीची बातमी छापल्यानंतर जालन्यात पत्रकाराला लाठ्याकाठ्यांनी मारहाण
अवैध वाळू संदर्भात बातम्या छापल्याचा मनात राग धरून एका पत्रकारावर त्याच्या दोन मित्रांसह लाठ्या काठ्यांनी हल्ला केल्याची घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद मध्ये घडलीय, काल दुपारच्या सुमारास मारहाण झालेला हा video व्हायरल झालाय.या video मध्ये 7 ते 8 जन लाठ्या काठ्यांनी पत्रकार आणि त्याच्या मित्राना मारहाण करताना दिसत आहे, दरम्यान या मारहाणीत दैनिक पुढारी चे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे हे जखमी झालेत, त्यांना उपचारासाठी औरंगाबाद ला हलवण्यात आलाय. दरम्यान याप्रकरणी अद्याप पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















