एक्स्प्लोर
Dhananjay Munde | कोणीही तक्रार केली म्हणून मी राजीनामा घेणार नाही, जयंत पाटलांकडून मुंडेंची पाठराखण
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते वेगवेगळ्या कारणामुळे सध्या अडचणीत सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर एक महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. तर नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. त्यामुळे विरोधक या दोन्ही प्रकरणात आक्रमक झाले असून दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















