Dawood Ibrahim : माफिया दाऊद इब्राहिमच्या आर्थिक व्यवहारांचा एनआयएकडून छडा
माफिया दाऊद इब्राहिमच्या आर्थिक व्यवहारांचा छडा एनआयएनं लावलाय.... भारतात काळ्या धंद्यातून मिळवलेला पैसा दाऊद पाकिस्तानात नेण्याचा प्रयत्न करतो. हा पैसा नंतर तो त्याच्या गँगसाठी वापरतोच, पण दहशतवादी कारवायांसाठीही त्याचा उपयोग करतो. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार दाऊदचा भारतातला अवैध कारभार आता कमी झाला आहे. आपल्या टोळीच्या माध्यमातून तो नाममात्र व्यवहार करतो. विशेषतः बनावट नोटा, ड्रग्जची तस्करी, धमकी देऊन खंडणी वसुली, स्मगलिंग, मानवी तस्करी अशा अनेक काळ्या धंद्यातून दाऊद मोठी रक्कम जमवत होता. हाच पैसा पाकिस्तानात नेण्याचा त्याचा प्रयत्न असे. दाऊदनं जमा केलेले करोडो रुपये मुंबई, ठाण्यात रियल इस्टेटमध्ये गुंतवले होते. पण रेरा आणि अन्य नियमांमुळे अंडरवर्ल्डचे सुमारे एक हजार कोटी रुपये अडकून पडल्याची माहिती आहे.























