Dhule Crime : तरूणाने धर्माची ओळख लवपत वेळोवेळी अत्याचार केल्याचा धुळ्यातील एका महिलेचा आरोप
तरूणाने धर्माची ओळख लवपत वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप धुळ्यातील एका महिलेने केलाय. एका २४ वर्षीय महिलेने अर्शद सलीम मलिक या तरुणाविरोधात तक्रार दाखल केलीय. पतीच्या निधनानंतर ती या तरुणासोबत वर्षभर लिव्ह इनमध्ये राहत होती. मात्र, लिव्ह इनमध्ये राहताना अर्शदने स्वत:चं नाव हर्षद माळी असं सांगितलं. लिव्ह इनची नोंदणी करताना तिला त्याचं खरं नाव समजलं. नंतर अर्शदने तिचं धर्मांतरही करून घेतलं. पहिल्या पतीकडून झालेल्या मुलाचा खतना करण्याचा प्रयत्न अर्शदने केला. त्याला विरोध केल्यानंतर अर्शदन श्रद्धा वालकरच्या हत्येची आठवण करून देत, तुझे ७० तुकडे करेन अशी धमकी दिल्याचा आरोपही तरुणीने केलाय. दरम्यान, अर्शद सलीम मलिकवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.























