एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजस्थानात बालकांच्या मृत्यूवरुन सोनिया गांधी गेहलोतांवर नाराज
कोटा येथील जेके लोन रुग्णालयामध्ये जवळपास 100 बालकं दगावल्याची माहिती उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर जोरदार टीका होत असतानाच आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
जयपूर : राजस्थानातील कोटा येथे डिसेंबर महिन्यात जेके लोन रुग्णालयामध्ये जवळपास 100 बालकं दगावली. यावरुन राजस्थान सरकारवर सगळ्या स्थरातून टीका होत आहे. अशातच आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनाही दिल्लीला बोलावून घेतले आहे.
सोनिया गांधींच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. जेके लोन रुग्णालयात झालेल्या बालमृत्यूप्रकरणी सरकार संवेदनशील आहे. त्यावर राजकारण करता कामा नये. कोटाच्या या रुग्णालयातील बालमृत्यूचं प्रमाण सातत्याने कमी होत आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी आमचे यापुढेही प्रयत्न सुरू राहतील, आई आणि बाळ स्वस्थ राहवे, हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे ट्विट गेहलोत यांनी केलं आहे.
राजस्थानमध्ये आमच्या सरकारने सर्वप्रथम 2003 मध्ये आयसीयू उभारले. तर, कोटात 2011 मध्ये बालकांसाठी आयसीयूची उभारणी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे तज्ज्ञांचे पथक राजस्थानात येणार आहे. आरोग्य सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी या पथकाचे आम्ही स्वागत करत असल्याचे गहलोत म्हणाले. या पथाकाशी चर्चा करुन आमच्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तयार आहे. निरोगी राजस्थान आमची प्राथमिकता असल्याचंही त्यांनी सांगितले. सोबतच माध्यमांचा कोणताही दबाव न घेता या पथकाने सत्य मांडण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. 'त्या' विधानामुळे गहलोत अडचणीत - "राज्यातील प्रत्येक रुग्णालयात दररोज 3-4 मृत्यू होतात. त्यामुळे या गोष्टी काही नवीन नाहीत", असे विधान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केलं होतं. या विधानानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली. दरम्यान, आत्तापर्यंत जवळपास 100 बालकं जेके लोन रुग्णालयामध्ये दगावली आहेत. हेही वाचा - धक्कादायक : राजस्थानमध्ये एका महिन्यात 100 बालकांचा मृत्यू Nashik Blind Cricket | दृष्टिहीनांच्या क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद विदर्भाला, नाशिकमध्ये आयोजन | ABP MAJHAजेके लोन अस्पताल, कोटा में हुई बीमार शिशुओं की मृत्यु पर सरकार संवेदनशील है। इस पर राजनीति नहीं होनी चाहिए। कोटा के इस अस्पताल में शिशुओं की मृत्यु दर लगातार कम हो रही है। हम आगे इसे और भी कम करने के लिए प्रयास करेंगे। मां और बच्चे स्वस्थ रहें यह हमारी सर्वोच्च प्राथमिकता है। 1/
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) January 2, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement