एक्स्प्लोर

चंद्रपुरातील मानवी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी सपना शुटरला हिमाचल प्रदेशातून अटक

मानवी तस्करीचे खळबळजनक प्रकरण उजेडात आलंय. 20 वर्षांपूर्वी चंद्रपुरातून अपहरण करुन हरियाणात विक्री केलेल्या मुलीची सुटका करण्यात आली आहे. या मुलीच्या प्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आली असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे.

चंद्रपूर - मानवी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी सपना शुटर उर्फ युनिता टाक हिला चंद्रपूर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. हिमाचल प्रदेशातील नाहन येथून तिला अटक करण्यात आली आहे. सपनाच्या अटकेने या मानवी तस्करीतील अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. चंद्रपूरची एक युवती हरियाणातील पानीपत येथून 20 वर्षानंतर शहरात परतली. तिच्या तक्रारीनंतर ही साखळी उलगडत गेली आहे. मुख्य आरोपीला ताब्यात घेऊन तिच्याकडून प्रकरणाची इत्यंभूत माहिती मिळविली जाणार आहे. चंद्रपूर शहरातील मानवी तस्करीचे एक खळबळजनक प्रकरण उजेडात आले असून रामनगर पोलिसांनी या प्रकरणी दोन महिलांना अटक केली आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण उघडकीस आल्याने अल्पवयीन मुलींच्या तस्करीचे एक मोठे रॅकेट चंद्रपूर जिल्ह्यात उजेडात येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा राज्यातील फतेहाबाद येथे काही दिवसांपूर्वी घरात डांबून ठेवलेल्या एका महिलेची स्वयंसेवी संस्थांनी पोलिसांच्या मदतीने सुटका केली होती. धर्मवीर नावाच्या व्यक्तीने तिला एका भाड्याच्या खोलीत डांबून ठेवले होते. मात्र, घर मालकाला या मुलीच्या वर्तनाचा संशय आल्याने त्याने विचारपूस करताच खरा प्रकार उजेडात आला. या घरमालकाने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पोलिसांना याची माहिती देत मुलीची सुटका करवली. दरम्यान हरीयाणा पोलिसांनी यासंबंधीचा मूळ गुन्हा शोधून काढला आणि या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली. 'ती' 20 वर्षानंतर शहरात परतली - सुटका करण्यात आलेली मुलगी मूळची चंद्रपूर शहरातील आहे. चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या बंगाली कॅम्प परिसरात असलेल्या एका मंदिराच्या प्रांगणातून 2010 साली अकरा वर्षाच्या या मुलीचे आरोपींनी प्रसादातून गुंगीचे औषध देत अलगद अपहरण केले. या मुलीला तातडीने हरियाणा राज्यातील पानीपत येथे नेत तिची विक्री केली गेली. शेतावरील एका घरात तिला डांबून ठेवण्यात आले. खरेदी केलेल्या व्यक्तीच्या मुलांनी या कोवळ्या जीवावर सतत अत्याचार केले. अजाणत्या वयात या मुलीचा तब्बल सातवेळा सौदा झाला. तर अत्याचाराच्या परिसीमेने मुलगी दोन मुलांची आई देखील झाली. विक्रीच्या निमित्ताने तिला हरियाणातील विविध शहरात ठेवले गेले. हे प्रकरण सातत्याने सुरू असताना हरियाणा राज्यातीलच फतेहाबाद येथे सातव्यांदा तिला धर्मवीर नावाच्या व्यक्तीला विकण्यात आले. मात्र, घरमालकाच्या समयसूचकतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले. चंद्रपूरच्या रामनगर पोलिसात हा गुन्हा दाखल असल्याने रामनगर पोलिसांच्या पथकाने फतेहाबाद गाठून या मुलीला चंद्रपुरात परत आणले आहे. रामनगर पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी जान्हवी आणि सपना या दोन महिलांना अटक केली असून या मागे रॅकेट मोठे असल्याचा पोलिसांना संशय आहे. Aurangabad | शिर्डीत मानवी तस्करी, अवयवांचा व्यापार होतो का?; औरंगाबाद खंडपीठाचा प्रशासनाला सवाल | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
Embed widget