Zero Hour : चंद्रपुरातील सभेतून मोदींचा ठाकरेंवर प्रहार, दहा वर्षांनी मोदी चंद्रपुरात
Zero Hour : चंद्रपुरातील सभेतून मोदींचा ठाकरेंवर प्रहार, दहा वर्षांनी मोदी चंद्रपुरात
प्रखर हिंदुत्वाचा चेहरा बनलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार सभा आज पार पडल्या..
आधी मोदींच्या सभेचं विश्लेषण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात पार पडली..सभेचे स्थान ... चंद्रपूर लोक सभा मतदार संघ ...
आता चंद्रपूरच का?
तर हा तो मतदार संघ आहे जिथे गेल्या खेपेला म्हणजेच 2019 साली महाराष्ट्रातून काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार विजयी झाला होता.. बाळू धानोरकर ..ज्यांचा नंतर दुर्दैवी मृत्यू झाला. आता इथून त्यांच्या आमदार पत्नी प्रतिभा धानोरकरांना काँग्रेसने खासदारकीची उमेदवारी दिली आहे.
जे २०१९ मध्ये झाले, ते २०२४ मध्ये होऊ नये म्हणून खुद्द पंतप्रधान मोदी सर्वात आधी इथे आले असे म्हणावे लागेल.
भ्रष्टाचाराचा पाढा वाचत मोदींनी काँग्रेसच्या सरकारांवर घणाघात केला.. तर दुसरीकडे राष्ट्रविकासापासून राम मंदिरांच्या निर्मितीपर्यंत.. असा विविध क्षेत्रात एनडीए सरकारमुळे देशाचा विकास होईल.. असा विश्वास मोदींनी मतदारांना दिला..
या मतदारसंघात भाजपनं सुधीर मुनगंटीवारांच्या रुपानं हायप्रोफाईल उमेदवार मैदानात उतरवालय. मोरवा विमानतळालगतच ही सभा पार पडलीय.. विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली.. सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतर नेते उपस्थित होतेच.. मात्र, खरी चर्चा झाली... ती इथं सहभागी झालेल्या महिल्यांच्या संख्येची..