Zero Hour : फडणवीसांच्या मध्यस्तीने जानकर नरमले, Mahadev Jankar महायुतीतच, रासपला महायुतीत एक जागा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : फडणवीसांच्या मध्यस्तीने जानकर नरमले, Mahadev Jankar महायुतीतच, रासपला महायुतीत एक जागा
आपण नुकतंच नेत्यांच्या आणि राजकीय पक्षांच्या संघर्ष गाथा ऐकल्यात. मात्र आता आम्ही वळतोय मनोमिलनाच्या आणि सहमतीच्या बातम्यांकडे.
महायुतीमधील सर्व पक्षांना आणि प्रमुख नेत्यांना एकत्र गुंफणारा धागा म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.. फडणवीसांच्या सागर बंगल्यावरचा राबता सध्या चांगलाच वाढला आहे. समस्या भाजपमध्ये असो..राष्ट्रवादीत असो किंवा शिवसेनेत असो.. रासपमध्ये असो किंवा अगदी शिवसंग्राममध्ये.. समस्यांचं उत्तर मिळण्यासाठी सर्वांची पावलं एकाच पत्त्याकडे वळतात तो पत्ता म्हणजे.. मुक्काम पोस्ट सागर..
काल याच पत्त्यावरुन मविआच्या दोन तीन स्वप्नांना सुरंग लावला गेला.. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीवर नाराज होते, ते आपल्या गळाला लागतील अशी मविआ नेत्यांना आशा होती. काही दिवसांपूर्वीच जानकरांनी शरद पवारांची भेट घेत माढ्याच्या जागेबाबत चर्चा केली होती. तेच महादेव जानकर काल सागर बंगल्यावर पोहोचले. आपण महायुतीसोबतच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन हा निर्णय घेतल्याची त्यांनी घोषणा केली. जानकरांच्या रासपला लोकसभेची एक जागा सोडण्याचा निर्णय झाल्याचंही सुनील तटकरे यांनी सांगितलं. जानकरांमुळे बारामती, माढा, सांगली, सोलापूर मतदारसंघात महायुतीचं बळ वाढणार आहे..