Zero Hour ABP Majha : राम मंदिर अयोध्या ते भारत न्याय यात्रा ; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour ABP Majha : राम मंदिर अयोध्या ते भारत न्याय यात्रा ; झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा लोकसभेतील विरोधीपक्ष नेते अधीररंजन चौधरी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आलंय.. राहुल गांधींना मात्र अद्याप निमंत्रण मिळाले की नाही हे स्पष्ट झालेले नाही.. तर राममंदिर आंदोलनातील मोठा चेहरा राहिलेले, आणि अयोध्येतच राहणारे विनय कटियार यांनाही अद्याप या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले नसल्याची माहिती आहे.. हे झाले ज्यांना निमंत्रण आले नाही.. abp माझाच्या सूत्रांच्यानुसार निवडणूक आयोगात नोंदणीकृत सर्व पक्षांच्या अध्यक्ष-नेत्यांना आणि संविधानिक पदावर असणाऱ्या नेत्यांना निमंत्रण दिल्या जाणार आहे. त्या सुत्रानुसारच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, यांना निमंत्रण आले असावे. पण ... निमंत्रण मिळूनही या सोहळ्याला जाणार नाही असे वृंदा करातांनी जाहीर करून टाकलेय ... कारण भाजप धर्माचे राजकारण करत आहे असा त्यांचा आरोप आहे. हेच कारण देत भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही या सोहळ्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय...