ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP Majha

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP Majha 

जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर, अपघातात गंभीर जखमी झालेल्या काही प्रवाशांचाही मृत्यू 
जळगावच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर...जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती  
सैफवर हल्ला केलेल्या चाकुचा तिसरा तुकडा पोलिसांना सापडला..आरोपीने हल्ल्यानंतर वांद्रे तलाव परिसरात फेकला होता चाकुचा तुकडा 
अभिनेता सैफच्या रिकव्हरीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांचे सवाल, तीक्ष्ण शस्त्राची जखम आणि सहा तासांच्या ऑपरेशननंतर फक्त पाच दिवसात एवढा फिटनेस कसा, एक्स पोस्टद्वारे शंका 
बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा..केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश, माजी खासदार राहुल शेवाळेंच्या मागणीची गृहमंत्रालयाकडून दखल.  
मुंबईत रिक्षा-टॅक्सीची तीन-तीन रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित, रिक्षाचं किमान भाडे तेवीस रुपयांवरुन सव्वीस रुपयांवर तर टॅक्सीचं किमान भाडे सध्याच्या अठ्ठावीस रुपयांवरुन एकतीस रुपयांवर

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola