Bird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special Report
रायगडच्या उरणमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं आढळल्यानं ही समस्या आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचल्याचं दिसत आहे. चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांच्या कोंबड्यांचा काही दिवसांपासून मृत्यू होत होता. त्यामुळं त्यांची तपासणी करण्यात आली. भोपाळ आणि पुण्यात झालेल्या तपासणीत काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झालं. त्यामुळं चिरनेरपासून १० किलोमीटर अंतरावरील सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्या आणि त्यांची अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळं कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.