Ajit Pawar BJP Special Report : सिंचन घोटाळ्याचं भाजपनं काय केलं? भाजपच्या हिंदुत्वाचं काय झालं?
abp majha web team
Updated at:
03 Jul 2023 11:11 PM (IST)
एकाच राज्यात एकाच विधानसभेत चार वर्षात चार शपथविधी.. हा नवा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर जमा झालाय.. पण सत्ता स्थापन करताना चार वेळा कोणता पक्ष, कोणत्या पक्षातले कोणते नेते कुणाबरोबर गेले याचा हिशेब सध्या कुणालाच लागत नाहीय.. सत्तेच्या खेळात सगळे राजकीय विधिनिषेध बाजूला सारले गेलेत... आणि रोजच्या जगण्याचा संघर्ष करत हा सत्तासंघर्ष पाहणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले प्रश्न मात्र राजकीय नेत्यांच्या गावीही नाहीत...