Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
आशियाई चषकाच्या साखळी सामन्यात Team India ने Pakistan चा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात Pakistan ने भारतासमोर 128 धावांचे सोपे लक्ष्य ठेवले होते. Team India ने हे आव्हान सोळाव्या षटकातच पार केले. अभिषेक शर्माने अवघ्या 13 चेंडूत 31 धावा पटकावल्या. कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या, त्याला अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी चांगली साथ दिली. Team India जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, तर Pakistan आठव्या स्थानावर आहे. Pakistan कडे अनुभवी खेळाडूंची वानवा होती, त्यामुळे त्यांची सुरुवात खराब झाली आणि फलंदाज फार काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत. नागपूरमध्ये Team India च्या विजयाचा मोठा जल्लोष करण्यात आला. नागपूरकरांनी 'भारत माता की जय' आणि 'Operation Sindoor' चे नारे दिले. एका नागपूरकराने सांगितले की, "आजच्या मॅचचा हिरो India होती आणि India नेहमीच Pakistan ला हरवेल." नागपूरकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.