ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
आशिया चषकातील महामुकाबल्यात टीम इंडियाची बाजी.. पाकिस्तानचा सात विकेट्सनी धुव्वा, प्रभावी गोलंदाजीनंतर भारतीय फलंदाजांचाही पाकिस्तानला दणका
भारतीय संघानं पाकिस्तानवर मिळवलेला विजय पहलगाम हल्ल्यात जीव गमवलेल्यांना आणि सैन्याला समर्पित....कालच्या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचं वक्तव्य.
गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कारभार....आज राजभवनात होणार आचार्य देवव्रत यांचा शपथविधी
महाराष्ट्रात अस्थिरता असल्याच्या शरद पवांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्याचा पलटवार...शरद
पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं ... फडणवीसांचा खोचक टोला.
नाशकात आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा, पक्षाचे महत्वाचे नेते मोर्चात सहभागी होणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चेबांधणी, रात्री उशिरापर्यंत आमदार, खासदारांची बैठक...मुंबई, ठाणे मनपावर भगवा फडकलाच पाहिजे, शिंदेंचं मार्गदर्शन
मुंबईत आणखी एका कबुतरखान्याची भर....मंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तीन मूर्ती जैन मंदिराजवळ नव्या कबुतरखान्याचं उद्घाटन.. मुंबईतील कबुतरखान्याची संख्या ५२ वर