Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Continues below advertisement
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या काही दिवसांत होणार आहे. या विमानतळाला दिवंगत नेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. सरकारने विधीमंडळात या मागणीला मंजुरी दिली होती, मात्र त्यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात भिवंडी ते दिबा पाटील यांच्या जन्मगावी जासईपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत ठाणे, नवी मुंबई आणि पालघर भागातील भूमिपुत्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "एक आठवड्यात जर नोटिफिकेशन आलं नाही तर पूर्ण पालघर, नवी मुंबईत आणि नवी मुंबईच्या काही भागात हे कंप्लीट घेराव घातला जाईल. २० तारखेला उद्घाटन असेल तर २८ तारखेला विमानतळाला घेराव घातला जाईल आणि लाखोच्या संख्येनं लोक असतील," असा इशारा रॅलीतील नेत्यांनी दिला. ही आमच्या अस्मितीचा प्रश्न असल्याचे भूमिपुत्रांनी म्हटले आहे. यापूर्वीही दिबा पाटील यांच्या नावासाठी अनेक आंदोलने झाली आहेत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement