Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Continues below advertisement
पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथे एका अज्ञातानं एका पाळीव कुत्र्याला अमानुष मारहाण केली. ही घटना आकुर्डी परिसरातील एका दुकानासमोर घडली. या व्यक्तीनं सायबेरियन हस्की जातीच्या कुत्र्यावर दगडानं आणि लाकडी दाणक्यानं बेदम मारहाण केली. अठरा वेळा वार करत या व्यक्तीनं कुत्र्याचा जीव घेतला. ही संपूर्ण घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहे. मारहाण केल्यानंतरही हा व्यक्ती थांबला नाही. त्यानं कुत्र्याचा मृतदेह फरफटत रस्त्यावर आणला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही सर्व क्रूर दृश्ये स्पष्टपणे दिसत आहेत. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement