अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील लसीकरण मोहीम यशस्वी,नक्षल्यांचा गड,प्रशासनाची पॉवर! गडचिरोली बिनागुंडा
बिनागुंडा महाराष्ट्रातील पूर्वेचा शेवटचा टोक! अतिमागास, अतिदुर्गम व नक्षल प्रभावित माडीया जमातीचा क्षेत्र! छत्तीसगड राज्यालगतच्या या संपूर्ण भागाला ' अबुजमाड ' या नावाने संबोधले जाते.नक्षलवाद्यांच्या मते हा भाग ' मुक्त क्षेत्र '(Liberated Zone) मानला जाते. भारत सरकारने या भागाला असुरक्षित क्षेत्र मानले आहे.अशा परिसरात लोकांमध्ये कोविड-19 लसीकरणाबद्दल पसरलेल्या अफवा व गैरसमज दूर करून लसीकरण करणे म्हणजे एक अग्निदिव्य होते.परंतू प्रशासनातील तरुण अधिकाऱ्यांनी अथक परिश्रमाने अप्पर जिल्हाधिकारी मनुज जिंदाल,तहसीलदार अनमोल कांबळे यांनी 18 किलोमीटर भयावह प्रवास करून नक्षलवाध्यांचा बालेकील्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिनागुंडा पहाडावरील गावात पोहोचले आणि जनजागृती करुन अशक्य अस लसीकरण कार्य यशस्वी पूर्ण केले.
All Shows
































