(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tipu Sultan Controversy : मुंब्रामधील रॅलीत टिपू सुलतनचे पोस्टर, स्वातंत्र्यदिनी उफाळळा वाद ABP Majha
पुणे : टिपू सुलतान (Tipu Sultan) विरोधात पुण्यातील भाजप कार्यकर्ते (BJP)आक्रमक झाले आहेत. टिपू सुलतानचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही, असं म्हणत टिपू सुलतानच्या जयंतीला विरोध केला आहे. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तातडीने अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी केली. पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत, असा भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी इशारा दिला.
काय म्हणाले धीरज घाटे?
ज्याने असंख्य हिंदूंची कत्तल केली ज्याने अनेक लोकांचे बळजबरी धर्मांतर करून त्यांचा अमानुष छळ केला अशा धर्मांध विकृती असलेल्या टिपू सुलतान ची जयंती महाराष्ट्रात साजरी केली जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत असा इशारा भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तातडीने अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना शासन करण्याची मागणी केली.
नुकतीच पुण्यात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात आली. पुढे बोलताना घाटे यांनी पोलिसांनी या बाबत गंभीरतेने दखल घेऊन या लोकांचा शोध घेऊन कारवाई करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी केली. या शिष्टमंडळामध्ये घाटे यांच्यासह सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर ,राजेंद्र शिळीमकर ,राहुल भंडारे ,वर्षा तापकीर, महेश पुंडे यांचा समावेश होता.
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी काही जणांकडून जाणीवपूर्वक अशी कृत्ये केली जात असल्याचे दिसते. केवळ धर्म वेगळा होता म्हणून ज्याने येथील नागरिकांवर अत्याचार केले. त्याच्या उदात्तीकरणाचा प्रकार पुणे शहर भारतीय जनता पार्टी कधीच खपवून घेणार नाही. आपण या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा आणि यामागे नक्की कोण लोक आहेत, याचा शोध घ्यावा, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. पुण्यातील शांतता बिघडेल, अशा गोष्टींना अजिबात थारा दिला जाऊ नये. पोलिसांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करावा, अशी आमची मागणी आहे. आपण या प्रकरणात लक्ष घालून संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश द्यावेत, अशी विनंती आम्ही करतो, असं त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.