Shivsena VS BJP : Narayan Rane यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे शिवसेना - भाजपमध्ये कायमचा काडीमोड?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्या केल्याप्रकरणी अटक झालेल्या नारायण राणे यांना रायगड कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचं म्हणत न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी कोर्टात 7 दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती नाकारली. भविष्यात असे प्रक्षोभक वक्तव्य करू नये असे लिहून देण्याची मागणीही पोलिसानी कोर्टात केली होती.
नारायण राणे यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलमे चुकीची आहेत. पोलीस तपासासाठी दिलेली कारणे देखील योग्य नाहीत. नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी कोणतीही लेखी नोटीस दिली नाही, असा युक्तिवाद नारायण राणे यांच्या वकीलांनी केला.
दरम्यान, नारायण राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सुरू झालेल्या ह्या राजकीय गदारोळात शिवसेना - भाजपमध्ये कायमचा काडीमोड होणार का, पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.