(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Special Report MNS : पदवीधर निवडणुकीत राज ठाकरेंचा यू-टर्नचा सिलसिला, पानसेंचा अर्ज मागे
Special Report MNS : पदवीधर निवडणुकीत राज ठाकरेंचा यू-टर्नचा सिलसिला, पानसेंचा अर्ज मागे, पाहा स्पेशल रिपोर्ट
हे देखील वाचा
PM Swearing Ceremony: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार; शपथविधीची तारीख आणि वेळ ठरली!
PM Swearing Ceremony: नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी (Prime Minister) विराजमान होणार आहेत. रविवार, 9 जून 2024 रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीची (Swearing Ceremony) तारीखही ठरली असून 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता मोदी पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.
9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे, असंही जोशी यांनी जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यासाठी जमलेल्या एनडीए नेत्यांना सांगितलं आहे.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या नवनिर्वाचित खासदारांची शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठर पार पडली. एनडीएच्या खासदार, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा मोदींच्या नेतृत्वाच्या समर्थनार्थ ठराव मांडण्याची अपेक्षा आहे, मित्रपक्ष आणि खासदारांनी त्यास अनुमोदन देण्याची शक्यता आहे.