Special Report Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात बर्फाची चादर, बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम
Special Report Himachal Pradesh Snowfall : हिमाचल प्रदेशात बर्फाची चादर, बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम
हिमाचल प्रदेशात सध्या जोरदार बर्फवृष्टी होतेय. सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचं पहायला मिळतेय. स्पितीमधील किलाँग भागात जोरदार बर्फवृष्टी होतेय. या भागात तापमानात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच या बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झालाय. तर तिकडे जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्येही हिमवर्षावामुळे दृश्यमानता कमी झालीय. या बर्फवृष्टीचा पर्यटक मोठा आनंद घेतायत. तसंच हिमाचलमधील रामबन येथे ही बर्फवृष्टी झालीय. रामबन येथील सर्व घरांवर बर्फच बर्फ साचलाय. त्यामुळे स्थानिकांना संकटांना सामोरं जाव लागतंय... मात्र पर्यटकांसाठी सगळीकडे नयनरम्य चित्र सध्या पहायला मिळतंय.
All Shows

































