Shrikant Shinde :श्रीकांत शिंदेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतून कारभार?काय आहे प्रकरण?Special Report
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे सुपर सीएम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या रविकांत वरपे यांनी केला आहे. आता वरपे यांनी केलेला हा आरोप कशाच्या भरवंशावर केला असा प्रश्न तुम्हालाही पडला असणार. तुमच्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तर आहे.. श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो. खासदार श्रीकांत शिंदेंचा हा फोटो रविकांत वरपे यांनी आरोप करण्यासाठी पुढे आणलाय. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून त्यांचा कारभार करत असल्याचा आरोप वरपे यांनी फोटोच्या हवाल्यानं केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात, असा आरोप वरपे यांनी केला आहे.
All Shows
































