Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड, प्रेमाच्या 35 तुकड्यांची इनसाईड स्टोरी
Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड, प्रेमाच्या 35 तुकड्यांची इनसाईड स्टोरी
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. आरोपी आफताबला जवळपास अडीच तास क्राईम सीनवर नेऊन पोलिसांनी तपास केलाय. सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलीस आरोपी आफताबला घेऊन महरौलीच्या जंगलात पोहोचले. या ठिकाणी श्रद्धाच्या हत्येप्रकरणी धागेदोरे मिळवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे याच महरौलीच्या जंगलात फेकले होते.. त्यामुळे महरौलीच्या जंगलातून श्रद्धाच्या हत्येसंदर्भात धागेदोरे मिळवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. जंगलात तपास केल्यानंतर पोलीस आफताबला घेऊन महरौली पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे.
All Shows

































