Sharad Pawar vs Sanjay Raut : सामना अग्रलेखावरुन शरद पवारांचा संजय राऊतांवर पलटवार
abp majha web team
Updated at:
09 May 2023 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी गुरू शिष्यात निर्माण झालेल्या शाब्दिक वादाची... शरद पवार हे गुरूस्थानी असल्याचं संजय राऊत अनेकदा बोललेत. मात्र, त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून, थेट गुरूवरच परखड शब्दांत टीकास्त्र डागलं होतं. पवारांना राजकीय वारसदार निर्माण करता आला नसल्याचं अग्रलेखात लिहिलं होतं. त्याला आता पवारांनीही सडेतोड उत्तर दिलंय. आपला पक्ष पुढे कसा जाणार हे आमच्या सहकाऱ्यांना माहित आहे. सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी राऊतांना खडेबोल सुनावलेत. दरम्यान, आधी शिष्यानं टीका करून सामना सुरू केला, मात्र गुरूनेही लगोलग रोखठोक भाषेत शिष्याला सुनावल्याची चर्चा रंगलीय.पाहूूया..