Special Report : अजितदादा, ऐका नाहीतर... ठाकरे-शाहांच्या भेटीवरुन राऊतांची गुगली ABP Majha
पुणे : पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवरुन शिवसेनेनं सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, पालकमंत्री आपले नाहीत, पण राज्यात आपली सत्ता आहे. पण आपलं इथं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल. की मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आज? पण थोडं थांबा चुकीचं लिहू नका. ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत, कारण आम्हाला उद्या दिल्लीवर ही राज्य करायचं आहे. कोण कुठं बसतात हे पाहतायेत, तिथं आपल्याला पोहचायचे आहे. त्याचा अंदाज घेतायेत. त्यामुळं अजित दादांशी बोलू आपण, आपल्याला एकत्र काम करायचं आहे. ते ऐकतील नाहीतर अवघड होईल, असं संजय राऊत म्हणाले.
All Shows































