Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे कडाडले, सरकारला दिले तीन पर्याय!
मुंबई : 6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही भूमिका घेतली नाही तर रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वगैरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला आहे. ते म्हणाले की, मी राज्यसभेचा पगार घेतो, ती माझी जबाबदारी आहे. आता लोकांची जबाबदारी नाही तर ती आता आमदार आणि खासदार यांची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले. खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी मागील काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी महाराष्ट्र दौरा केला. त्यानंतर आता त्यांनी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे प्रमुख आणि वरिष्ठ नेते यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
All Shows

































