Wankhede : क्रिकेटचे ब्रँड, वानखेडेवर 'स्टँड' गौरव दिग्गजांचा, सोहळा क्रिकेटचा Special Report
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शानदार सोहळा आज पार पडला. क्रिकेटसाठी मोलाचं योगदान देणाऱ्या तीन दिग्गजांच्या नावाने स्टेडियमधील स्टँडचं नामकरण करण्यात आलं. आयसीसी, बीसीसीआय आणि एमसीए अध्यक्ष शरद पवार, माजी कर्णधार अजित वाडेकर आणि विश्वविजेता कर्णधार रोहित शर्मा यांच्या सन्मानार्थ या स्टँड्सचं नामकरण झालंय. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या यादगार सोहळ्याचे खास क्षण पाहूया.
वानखेडे स्टेडियममध्ये आज एक भव्य सोहळा पार पडला. टीम इंडियाचा हिटमॅन, मुंबईचा अभिमान रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावाने स्टँडचं नामकरण करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला. या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुद्धा उपस्थिती होते. याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर(Ajit Wadekar and) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाने देखील स्टँडचं नामकरण झाले. तसेच एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या नावाने एमसीए ऑफिस लाउंजचं उद्घाटन झाले.
All Shows

































