Ratnagiri Refinery : Nanar की Barsu ? कुठे होणार रिफायनरी? नारायण राणे म्हणाले... Special Report
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता कोकणातील रिफायनरी प्रकल्प पुन्हा चर्चेत आलाय. अर्थात बारसू ऐवजी आता पुन्हा नव्यानं चर्चा झालीय ती नाणारची. नुकतीच नाणार समर्थकांनी फडणवीसांच्या भेटीची मागणी केली आहे. तर आधी रिफायनरीच्या विरोधात असणारे नेते समर्थनात बोलतायत. त्यामुळे कोकणातील रिफायनरी झालीच तर ती नेमकी कुठे होणार? रिफायनरीसंदर्भात नवीन सरकारची भूमिका काय असणार? कोकणातील रिफायनरीचं भवितव्य काय? जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून
2019 मध्ये रद्द झालेला नाणार रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय...आणि त्याला कारण आहे ते माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांचं विधान....कोकणातील रिफायनरी राज्याबाहेर गेली अशा बातम्या येत असताना राणे यांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण आहे....कारण, थेट कंपनी आणि पेट्रोलियम मंत्र्यांशीच या मुद्यावर चर्चा करणार असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे....