Rajkiya Shole On MNS : हिंदीविरोधात धार, मनसेचा एल्गार! पहिलीपासून हिंदीची सक्ती, राजकारण रंगलं
Rajkiya Shole On MNS : हिंदीविरोधात धार, मनसेचा एल्गार! पहिलीपासून हिंदीची सक्ती, राजकारण रंगलं
नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यात पहिल्या इयत्तेपासूनच हिंदी अनिवार्य करण्यात आलंय. पण राज्य सरकारच्या याच निर्णयावरुन आता मोठं राजकारण रंगतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या हिंदी सक्तीला तीव्र विरोध केलाय. इतकंच नव्हे तर टोकाचा संघर्ष करण्याची आक्रमक भूमिका घेतलीय. यासाठी मनसे लवकरच हिंदी सक्तीविरोधात मराठी जागर परिषद भरवणारय... पाहूयात हा खास रिपोर्ट....
मनसेनं पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आंदोलनाचं हत्यार उपसलंय...
यावेळी विषय आहे हिंदी...
इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीच्या राज्य सरकारच्या धोरणाला मनसेनं कडाडून विरोध केलाय...
राज ठाकरेंनी संघर्षाची भूमिका जाहीर केल्यानंतर मनसेनेचे कार्यकर्ते मैदानात उतरलेत...
आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, असे बॅनर मनसेकडून ठिकठिकाणी झळकतायत...
या विषयावर राज ठाकरेंनी पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली...
हिंदी सक्तीविरोधात मराठी जागर परिषद भरवण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत...
All Shows

































