Pune Porsche Car Accident : रॅश ड्रायव्हिंग...अपहरण, आमिष आणि धमकी
Pune Porsche Car Accident : रॅश ड्रायव्हिंग...अपहरण, आमिष आणि धमकी
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाला एक आठवडा उलटला तरी दररोज नवनवीन माहिती समोर येतेय. आता अल्पवयीन आरोपीच्या आजोबानांही अटक केल्यानं एकाच घरातल्या तिघांना गजाआड जावं लागलंय. आरोपीला वाचवण्यासाठी वडील आणि आजोबांनी केलेले धक्कादायक प्रतार समोर आलेत. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...
पुणे: पुण्यातील कल्याणी नगर परिसरात दारुच्या नशेत भरधाव वेगाने पोर्शे कार चालवत एका श्रीमंत बापाच्या अल्पवयीन मुलाने दोघांना उडवले. या अपघातात (Accident) अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या धनिकपुत्राच्या मदतीसाठी चक्क एका आमदाराने पोलीस स्टेशन गाठले होते. तर, पोलिसांनीही या बड्या बापाच्या लेकासाठी पाहुणचार केल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. विशेष म्हणजे या धनिकपुत्रासाठी पोलिसांकडून चक्क पिझ्झा (pizza) आणि बर्गर पुरवण्यात आल्याचा आरोपही पीडितांच्या नातेवाईकांनी केला होता. आता, शिवसेना (Shivsena) शहर समन्वयकांनीही स्वत: घडलेला प्रसंग सांगितला.
सगळे कार्यक्रम
![Ganga River Water Purification : स्वच्छतेचं मर्म, गंगेतच गुणधर्म Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/61138d766bda5866523f33b5740a076d173938384541790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/0801b7aeb07f45a3e86e3b29492775bb173938335454090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/947c91468b16e4fba7cf84a673f7ac95173938318949390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/7b4cdaa4947127a825263848565b8a3e1739295724215977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4e0f00adffdcc615cc7ad7a7e5d375181739294852498977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)