Sanjay Raut Special Report : संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर? कोर्टानं ईडीनं झापलं ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Nov 2022 10:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: तब्बल 100 दिवस आर्थर रोड जेलमध्ये राहिल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला. जामिनावर बाहेर आल्यानंतर आपण पुन्हा लढणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केलंय. तसंच शिवसेनेचा कणा मोडला नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं ते म्हणाले. पण त्याचसोबत संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मी शिवसैनिक आहे, जेलमध्ये असताना अनेक कैद्यांना मदत केली असं संजय राऊत म्हणाले. आर्थर रोड तुरुंगात सर्व प्रकारच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी असताना संजय राऊत यांनी नेमकी कुणाला आणि कशी मदत केली असा प्रश्न आता उपस्थित होतोय.