#MahaFloods सोलापूरमध्ये ऊस झोपला, बागा कोलमडल्या, सोयाबीन उध्वस्त..नवदाम्पत्याचा संसारही पाण्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Oct 2020 09:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 58 हजार हेकटर पेक्षा जास्त शेती बाधित झाली आहे. पाऊसाने उसंत घेतली मात्र नद्यांना आलेल्या पुरात उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. ऊस, सोयाबीन, कांदा सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत. दक्षिण सोलापुरातील अनेक गावत देखील हीच परिस्थिती आहे. तालुक्यातील औज गावात जवळपास 800 एकर शेती आहे. मात्र ही पूर्ण शेती आता पाण्याखाली गेलीय..