Mahadev Jankar Special Report : जानकरांची कोलांटउडी; 48 तास... आणि जानकर मविआतून महायुतीत
abp majha web team
Updated at:
24 Mar 2024 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहल्लीच्या राजकारणात, कुठला नेता आज कुठे आहे आणि उद्या कुठे आहे? याचा थांगपत्ता लागणं अत्यंत कठीण आहे. दिवस पलटला रे पलटली की काही नेते, रात गयी, बात गयी... असं म्हणत, वेगळाच झेंडा घेऊन उभे ठाकतात... आणि याचं महत्त्वाचं उदाहरण महाराष्ट्राला बघायला मिळालंय, महादेव जानकर यांच्या रुपाने... ४८ तासांआधी शरद पवारांशी चर्चा करून, तिकीट पदरात पाडून घेणाऱ्या महादेव जाणकरांची भूमिका ३६० अंशात कशी बदललीय, आणि ते कधीकाली ज्यांच्यावर नाराज होते, त्या महायुतीत कसे सहभागी झालेत... पाहूयात या रिपोर्टमधून..