Latur Coffee Shop : कॉफीचा कप, नियमांचं कुंपण; तरुण-तरुणींच्या अवैध कृत्यांना लगाम Special Report
abp majha web team
Updated at:
21 Jun 2023 08:29 PM (IST)
बातमीय लातुरातून... लातूर शहरातील कॉफी शॉपवर निर्बंध घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. लातुरातील कॉफी शॉपमध्ये काही तरुण-तरुणी नियमबाह्य कृती करत असल्याचं कारण देत प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. त्यानुसार, कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही. तसेच, स्वतंत्र कंपार्टमेंट करण्यासही बंदी घालण्यात आलीय. त्याचसोबत, कॉफी शॉपमध्ये धूम्रपान करण्यासही मज्जाव करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे, कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य असणार आहे.