Jayant Patil : पाटलांचा गवगवा की नुसत्या अफवा? मविआत अस्वस्थता? Special Report
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला अखेरचा रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती घेतलं... अवघ्या काही तासांत ही घडामोड घडली... मात्र त्याचे हादरे संपूर्ण महाराष्ट्राला बसले... ते विरत नाहीत तोच आता नवी चर्चा सुरू झालीय... आणि ती म्हणजे शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेल्या जयंत पाटील यांची... सख्ख्या पुतण्याने काकांची साथ सोडली तरी शरद पवारांसोबत हनुमानासारखे एकनिष्ठ राहणारे नेते जयंत पाटील खरंच भाजपच्या वाटेवर आहेत का? आणि तसं असेल तर, त्याचा भाजपला काय फायदा होईल तसेच,शरद पवारांचं गणित कसं बिघडेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांची भूमिका काय असेल? याच प्रश्नांचा उहापोह करणारा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात...
All Shows

































