Gangster Ashwin Naik Special Report:मुंबईतील कुख्यात गँगस्टर 'माझा'वर इंजिनिअर अश्विन गुंड कसा झाला?
गोष्ट आहे एका इंजिनिअरची... अशा इंजिनिअरची, जो लंडनमध्ये शिकून आला... पण मुंबईत येऊन त्याने हातात पिस्तुल घेतलं... गोष्ट आहे त्या काळातली, जेव्हा मुंबईच्या क्षितिजावर गँगवॉरचा थरार होता... एकीकडे भाऊ कुख्यात गँगस्टर आणि दुसरीकडे पळून जावून लग्न केलेली उच्चशिक्षित बायको... अशी दोन वेगवेगळ्या टोकांची कौटुंबिक पार्श्वभूमी... हे ऐकून तुम्ही म्हणाल, की हा इंजिनिअर नोकरी किंवा व्यवसाय करेल... मात्र हा इंजिनिअर बनला काळ्याकुट्ट गुन्हेगारी विश्वातला कुख्यात डॉन... गँगस्टर भावाच्या आग्रहामुळे नाही, तर चक्क बायकोच्या हट्टापायी या इंजिनिअरने गुन्हेगारीच्या थरारक आणि जीवघेण्या दरीत उडी घेतली... नाव- अश्विन नाईक... वय- ६० वर्ष... सध्या- सबळ पुराव्यांअभावी तुरुंगाबाहेर... पाहूयात एकेकाळी अंगाचा थरकाप उडवणाऱ्या गँगस्टर अश्विन नाईकनं दिलेलं ग्यान...
All Shows


























