Fadnavis Shinde Car Driving Samruddhi Highway:सत्तेचं स्टेअरिंग,समृद्धीवर ड्रायव्हिंग Special Report
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. राज्याच्या सत्तासिंहासनावरचे तीन महारथी आज एकाच मंचावर आले. निमित्त होतं समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाचं. या उद्घाटनानंतर तिघांनीही एकाच गाडीत बसून समृद्धीच्या प्रवासाची गती अनुभवली. सत्तेचा प्रवास एकत्र करणाऱ्या या तिघांच्या समृद्धी महामार्गाच्या प्रवासावेळी कुणाच्या हाती होतं स्टेअरिंग? जाणून घेऊया या रिपोर्टमधून....
ड्रायव्हिंग सीटवर एकनाथ शिंदे...
बाजूला मुख्यमंत्री फडणवीस
आणि मागे उपमुख्यमंत्री अजित पवार...
समृद्धी महामार्गावरच्या इगतपुरी ते आमणे
मार्गावरचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा हा सुसाट प्रवास...
इगतपुरी ते आमणे
या समृद्धी महामार्गावरच्या अंतिम टप्प्याचं आज लोकार्पण झालं
त्यानंतर कार्यक्रमस्थळाहून राज्यातल्या तिन्ही मोठ्या नेत्यांनी एकत्रित प्रवास केला
तिघांनीही आधी महामार्गाच्या कामाची पाहणी केली...
महामार्गावरच्या सर्वात लांब आठ किमी बोगद्यातूनही प्रवास केला
आणि अधिकाऱ्यांकडून कामाची माहीती घेतली
त्यानंतर शिंदेंच्या हातातलं स्टेअरिंग मुख्यमंत्र्यांनी हाती घेतलं
आणि तिघेही पुन्हा कार्यक्रमस्थळी आले...
हा प्रवास जवळपास १८ ते २० किमीचा होता...
त्यानंतर तिन्ही नेत्यांनी माध्यमाशी संवाद साधला...
तेव्हा या एकत्रित प्रवासावर मुख्यमंत्र्यांनी आधी काय प्रतिक्रिया दिली ते ऐका...
या प्रवासात मागच्या सीटवर बसून
प्रवासाचा आनंद लुटणाऱ्या अजितदादांनी मात्र
मिश्किल टिप्पणी केली.... आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला...
२०१५ साली सुरु झालेला समृद्धी महामार्ग
अखेर पूर्णत्वास आला...
पण अखेरच्या टप्प्याच्या लोकार्पणावेळी
चर्चा रंगली ती तिन्ही नेत्यांच्या प्रवासाची
अक्षय भाटकरसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक
All Shows

































