Dhannanjay Munde & Pankaja Munde : मुंडे बंधू-भगिनी भगवान गडावर एकत्र येणार Special Report
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे... सख्खे चुलत बंधू आणि भगिनी... एकाच घरात लहानाचे मोठे झाले... पण गेल्या काही वर्षांत त्यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला... त्यामुळे गेल्या दहा वर्षांत धनंजय मुंडे भगवान गडावर दसरा मेळाव्याला गेलेच नाहीत... यंदा मात्र याच भगवान गडावर, दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र दिसणारेत... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...
धनंजय मुंडे आणि भगवानगड
२००९ साली गोपीनाथ
मुंडेंनी धनंजय मुंडेंऐवजी
पंकजांना तिकीट दिलं,
नाराजीला सुरूवात
२०१२ साली धनंजय
मुंडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
बंडानंतर लोकांच्या रोषामुळे
धनंजय मुंडेंना भगवान गडावरून
परत जावं लागलं
त्यानंतर धनंजय मुंडे
भगवान गडावर दसरा
मेळाव्याला गेले नाहीत
गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर दहा वर्षांपासून
पंकजा मुंडे दरवर्षी भगवान गडावर दसरा मेळावा
आयोजित करतात... मात्र या दहा वर्षांत धनंजय
मुंडे कधीही भगवान गडावर मेळाव्याला गेले नव्हते,
आता मात्र, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे
महायुतीच्या एकाच छताखाली आहेत...त्यांच्यातला
दुरावाही आता उरलेला नाहीय... म्हणूनच आता
धनंजय मुंडे भगवान गडावर दसऱ्यादिवशी जाणारेत