Bulli Bai : Github वर Muslim महिलांचे फोटो अपलोड, महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर
मुंबई : वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत आहे. मुस्लिम महिलांचे फोटो ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही केली आहे. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत अशा घटनांचा निषेध केला आहे. तसेच महिला आयोग कार्यालयाने दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत.
All Shows

































